अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी गौतम गंभीरकडून 1 कोटी रुपयांचा निधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. २१ जानेवारी: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टकडून निधी गोळा करण्याचं काम सुरु आहे. दरम्यान आज भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने मंदिराच्या निर्मितीसाठी स्वतःचं योगदान दिलं आहे. गंभीरने मंदिर उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

गौतम गंभीरने गुरुवारी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची भेट घेतली आणि मंदिरासाठीचा निधी ट्रस्टकडे सुपूर्द केला. ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद राम मंदिरासाठी देशभर निधी गोळा करत आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान (मदतीची मोहीम) सुरु केले आहे. या अभियानाद्वारे देशभरातील 5 लाख कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे विश्व हिंदू परिषदेचे उद्दिष्ट आहे, जेणेकरुन राम मंदिरासाठी निधी उभा करता येईल.

Gutam GambhirRam Mandir Temple