मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी लवकरच होणार जमा ई-केवायसी करा – आयुषी सिंह

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 13 ऑगस्ट – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात 1 लाख 56 हजार ऑनलाईन प्राप्त झाले असून त्यापैकी 1 लाख 53 हजार 164 अर्ज मंजूर करुन राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यावर लवकरच डिबीटीद्वारे निधी वितरीत केला जाणार आहे. यासाठी लाभार्थीचे बॅंक खाते हे आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तरी ज्या लाभार्थींचे खाते आधार कार्ड संलग्न नसेल किवा खातेदारांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या खात्यावर या योजनेचा निधी जमा होण्यासाठी संबधित लाभार्थींनी आपले खाते ई-केवायसी केल्याची पडताळणी करावी.

लाभार्थी बॅंक खाते आधार कार्ड संलग्न करण्यासाठी संबधित महिला लाभार्थी यांनी त्यांचे बॅंक खाते असलेल्या बॅंक शाखेत, बँक व्यवसायीक मित्र, सेतु केंद्र व बँक सुविधा केंद्र येथे तातडीने संपर्क करुन आपले बॅंक खाते आधार कार्ड संलग्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, यांनी केले आहे.