गडचिरोली जिल्ह्यात आज 10 कोरोनामुक्त तर 07 कोरोना बाधित.

जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37913 पैकी कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 11 ऑगस्ट :-  आज गडचिरोली जिल्हयात 349 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 07 असून कोरोनामुक्ताची संख्या 10 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37913 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37050 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 87 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 776 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.23 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये मुलचेरा तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 03, व धानोरा तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, मुलचेरा तालुक्यातील 08, जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :- 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

 

जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोलीमार्फत विविध स्पर्धेंचे आयोजन

Gadchiroli covid update