लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारत सरकारचे अधिवेशन ऐक महिण्याचे होत असताना महाराष्ट्र सरकार आपले अधिवेशन फक्त दोन दिवसाचे घेत असुन हे जनतेनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या जनतेला अधिवेशनाच्या माध्यमातून न्याय देणा-या अधिकाराचे हनन आहे तथा लोकशाहीचा गडा घोटण्याचा हा क्रुर प्रकार आहे. या दडपशाही व्रुत्ती चा निषेद करत “लोकशाही बचाव दिन” साजरा करत किसन नागदेवे, भाजपा जिल्हाध्यक्ष गडचिरोली यांच्या नेतृत्वात गडचिरोली भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी, गडचिरोली मार्फत महामहिम राष्ट्रपती, राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले.
जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देतांंना किसनजी नागदेवे, भाजपा जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली, योगीताताई पिपरे नगराध्यक्ष, न.प. गडचिरोली प्रकाश गेडाम, प्रदेश महामंत्री, भाजपा STM, महाराष्ट्र, प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री, गडचिरोली. गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री, सदानंद कुथे, जिल्हा संपर्कप्रमुख, गडचिरोली. डॉ. भारत खटि, जिल्हाउपाध्यक्ष. सुरेश शाहा जिल्हा अध्यक्ष, भाजपा बंगाली आघाडी, गडचिरोली उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करताना प्रदेश सदस्य रमेश भुरसे, न. प. गडचिरोलीचे उपाध्यक्ष अणीलजी कुनघाडकर, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, जिल्हामंत्री आनंद गण्यारपवार, चामोर्शी ता. अध्यक्ष दिलीप चलाख, भाजयुमो शहर अध्यक्ष सागर कुमरे, भाजयुमो महामंत्री भांडेकर, चामोर्शी ता. महामंत्री साईनाथ बुरांडे, अणीलजी पोहनकर, विनोद देवोजवार, शहर महामंत्री, न. प. सभापती, गडचिरोली उंदिरवाडे उपस्थित होते.
हे देखील वाचा :
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड धक्काबुक्की, भाजपच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन
उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे कृषी मेळाव्याचे आयोजन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!