गडचिरोली ब्रेकिंग: मुसळधार पावसाने गोविंदपूर पुलानजीक असलेला रपटा गेला वाहून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेला गोविंदपूर नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरु असून वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पुलानजीक असलेला रपटा आज सकाळी ११.०० ते १२.०० च्या दरम्यान वाहून गेल्याने गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गाचा संपर्क तुटला आहे.

काल मध्यरात्री आणि आज सकाळपासून गडचिरोली परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे.

 

गडचिरोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या गोविंदपूर गावानजीक असलेल्या नाल्यावर नवीन पुलाचे व सिमेंट रोडचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असून त्यामुळे ठिकठिकाणी पुलाच्या बांधकामानजीक  वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात रस्ता (रपटा) बनविण्यात आलेला आहे. गोविंदपूर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुलानजीक असलेला  रपटा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे व गावांचा संपर्क तुटला आहे.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची घेतली शपथ; जाणून घ्या