12 नक्षल्याद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली C60 पोलीस दलास मोठे यश.

चकमकी दरम्यान पोलीस उपनिरीक्षकाला खांद्याला गोळी लागल्याने जखमी..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 17 जुले – पोलीस आणि नक्षलवाद्यात आज झालेल्या चकमकीत तब्बल 12 नक्षलांना कंठस्नान घालण्यात गडचिरोलीत सी ६० पोलिस जवानांना मोठे यश आले आहे. छत्तीसगढ सीमेजवळ वांडोली गावात 12 ते 15 नक्षलवादी असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस विभागाच्या नक्षलविरोधी अभियानाने प्लॅन तयार करून मोहीम हाती घेत Dy SP Ops च्या नेतृत्वाखाली सात C-60 पथका घेवून सकाळी 10  वाजताच्या सुमारास छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.

दरम्यान आधीपासूनच दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी पोलीसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही जशास तसे नक्षलयाला उत्तर दिले. दुपारी सुरू झालेली चकमक तब्बल सहा तास सुरू होती. तर पाऊसही जोरदार सुरू होता. दरम्यान C-60 च्या अका पोलिस उपनिरीक्षकला आणि एक जवानाला गोळी लागून जखमी झाले आहेत. ते धोक्याबाहेर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

सहा तास चाललेल्या चकमकीनंतर नक्षलविरोधी अभियान तीव्र करून सदर घटनास्थळी शोध घेतले असता 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सी 60 पोलिसाच्या हाती लागले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ही हाती लागला आहे. यामध्ये 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली असून मृत झालेल्या एका नक्षलची ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी DVCM असून त्याचे नाव लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम, असल्याची माहिती मिळाली आहे, तर बाकी मृतकांची ओळख पटवण्याचे काम युद्ध स्तरावर काम सुरू असून घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करून शोध म्हणून सुरू आहे.

राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली चे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील यशस्वी मोठ्या करण्यात आलेल्या अभियानासाठी C-60 पोलीस जवानाचे कौतुक करून 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.