गडचिरोली-चामोर्शी मार्ग दुसऱ्याही दिवशी बंदच!, पोटेगांव – कुनघाडा रै. मार्गे वाहनांची वाढली आवागमन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली जिल्ह्यात कुनघाडा रै. ७ जुलैच्या रात्रीपासुन आलेल्या संततधार पावसामुळे गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर गडचिरोलीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोविंदपूर नाल्यावर तयार करण्यात आलेला रपटा काल ८ जुलै रोजी दुपारी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान वाहुन गेल्याने ठप्प पडलेली होती..

गडचिरोली- चामोर्शी मुख्य मार्गावरील वाहतुक आज दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजीही गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्पच आहे. यामुळे वाहतुक कुनघाडा रै- गिलगांव पोटेगांव मार्गे सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे.

रपटाच वाहुन गेला असल्याने रपटा पुर्ववत करण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने अवजड वाहनांना अन्य मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

हे देखील वाचा :

केंद्र सरकारच्या विरोधात आज चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन

१२५ जणांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यात नागपूर सायबर सेलच्या पोलिसांना यश

 

Gadchiroligovindpur pulllead story