गडचिरोली जिल्ह्यात आज 29 नवीन कोरोना बाधित तर 23 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 07 मार्च:आज जिल्हयात 29 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9692 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9408 वर पोहचली. तसेच सद्या 176 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.82 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 29 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 24, अहेरी तालुक्यातील 1, आरमोरी तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 1, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 23 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 20, अहेरी 1, धानोरा 1, तर कुरखेडा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रेव्हेन्यु कॉलनी 1, एमआयडीसी रोड टी पॉईट 2, नवेगाव 4, कोटगल 4, गोकुलनगर 1, शिवाजी हायस्कुल 1, झेडपी 1, मुलांचे वसतीगृह 10, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वैरागड 2, कुरखेडा तालुक्यातील मालडुगी 1, मुलचेरा तालुक्यातील विवेकनंदपुर 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona