गडचिरोली जिल्ह्यात आज 18 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 03 मार्च: आज जिल्हयात 18 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9511 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9363 वर पोहचली. तसेच सद्या 140 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.42 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.46 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.

नवीन 18 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 11 , अहेरी तालुक्यातील 2, आरमोरी तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 2, वडसा तालुक्यातील 1,जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 9 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 6, अहेरी 2, चामोर्शी 1, जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील मेडीकल कॉलनी 3, बसेरा कॉलनी 2, जिल्हा परिषद 4, वनश्री कॉलनी 1, चामोर्शी रोड 1, आरमोरी तालुक्यातील वैरागड 1, कुरखेडा तालुक्यातील कडोली 1, स्थानीक 1,चामोर्शी तालुक्यातील मुरखळा 1, वडसा तालुक्यातील गांधी वार्ड 1, अहेरी तालुक्यातील सीआरपीएफ 37 बीएन 1, स्थानीक 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona