गडचिरोली जिल्ह्यात आज 21 नवीन कोरोनाबाधित तर 18 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 12 मार्च: आज जिल्हयात 21 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9817 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9503 वर पोहचली. तसेच सद्या 206 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.80 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.10 टक्के तर मृत्यू दर 1.10 टक्के झाला.

नवीन 21 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 14, आरमोरी तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 4, तर वडसा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 18 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 11, चामोर्शी 1, व कुरखेडा तालुक्यातील 2 वडसा 1, अहेरी 2, आरमोरी 1,जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वोदय वार्ड 5, नवेगांव कॉम्पलेक्स 1, साईनगर 1, रामपूरी वार्ड 1, स्कॉलर्स शाळा 1, गोंडवाना सैनिक विद्यालय 1, बीसी आश्रम वस्तीगृह 1, समाज कल्याण वस्तीगृह 1, शिवाजी वार्ड 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4, आरमोरी तालुक्यातील काडमकोला 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, राजेंद्र वार्ड 1, तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 1 जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona