लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते चॅट बोटचा औपचारिक शुभारंभ व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना पर्जन्यमान, धरणांचे विसर्ग, पूरस्थिती, हवामान व रस्ताबंदीची माहिती 8275371485 या क्रमांकावर ‘Hi’ पाठवून मिळणार अधिकृत माहिती मेन्यू QR कोड स्कॅन करूनही करता येणार प्रणाली सक्रिय.
जिल्ह्यातील संपर्क तुटलेली गावे, प्रशासनाच्या सूचना, वीज अपघात टाळण्याचे उपाय याच माध्यमातून जिल्हा नियंत्रण कक्षासाठी 07132-222031, 222035 व 9423911077, 8275370508, 8275370208 हे क्रमांक उपलब्ध पोलीस नियंत्रण कक्षासाठी 07132-223142, 223149 व 9403801322 हे दूरध्वनी क्रमांक चॅट बोटसह https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 या लिंकवर अधिकृत व्हॉट्सअप चॅनेल.
अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांची प्रमुख उपस्थिती सहायक महसूल अधिकारी स्वप्नील माटे व पूर समन्वय अधिकारी गोपीचंद गव्हारे यांचा सहभाग.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सशक्त करण्याचे उद्दिष्ट नागरिक, विद्यार्थी, शाळा व संस्था यांनी या सेवा नियमितपणे वापराव्यात – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन.