गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडुन ४ गुन्हयातील जप्त ३२ किलो गांजा करण्यात आला जाळून नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली :  जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचीत्य साधुन आज शनिवारी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्था संदर्भात दाखल असलेल्या ४ गुन्हयातील जप्त ३२.१०६ किलो ग्रॅम गांजा जाळून नष्ट करण्यात आला.

सदर गांजा हा विविध कारवाया अंतर्गत पोस्टे देसाईगंज, पोस्टे गडचिरोली, पोस्टे चामोर्शी, उपपोलीस स्टेशन बामणी येथील पथकांनी पकडून जप्त केला होता.

गांजा जाळून नष्ट करतांना न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, गडचिरोलीचे आर. आर. खामतकर, समितीचे अध्यक्ष अंकित गोयल पोलीस अधिक्षक, गडचिरोली गठीत करण्यात आलेल्या कमेटी मधील सदस्य अपर पोलीस अधिक्षक, (प्रशासन) समीर शेख, प्र. पोलीस उप अधिक्षक अरविंदकुमार कतलाम तसेच स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक उल्हास पी. भुसारी, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर येथील सहा. रासायनिक विश्लेषक, अमोल वि. गाडगे, वजन मापे विभागाचे प्रतिनिधी रुपचंद निंबाजी फुलझेले निरीक्षक, शासकिय पंच प्रमोद बि. शातलवार, वरिष्ठ सहायक पाणी पुरवठा विभाग, जि.प.गडचिरोली, शैलेश पुरुषोत्तम दमके, वरिष्ठ सहायक शिक्षण विभाग जि.प. गडचिरोली यांचे उपस्थितीत करण्यात आले.

हे देखील वाचा :

अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना केली अटक 

केंद्र व राज्यसरकार शेतकरी विरोधी त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा  : संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

 

 

gadchiroli policelead story