लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल गडचिरोली शाळेने आयएसओ मानांकन पटकावले आहे. गडचिरोलीचे नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर,उपमुख्याधिकारी काटकर सर केंद्रप्रमुख सुधीर गोहणे सर मिहीर फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मेश्राम सर यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला एच. रामटेके यांना देण्यात आले.
या शाळेचे वैशिष्ट्यं :-
1)संपूर्ण शाळा डिजिटल आहे.
2)अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
3) शाळेची पटसंख्या नर्सरी ते आठवीपर्यंत 450 एवढी आहे.
4)नागपूर विभागातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ताधारक शाळा म्हणून ही शाळा पुरस्कृत आहे.
5)बॅडमिंटन स्पर्धेचे राज्यस्तरीय नेतृत्व कारण्यात आहे होते.
6)शाळेची परिसर विद्यार्थ्यांचा आवडीचा आहे.
7) शिष्यवृत्ती, नवोदय एन एम एम एस परीक्षा तयारी या शाळेत होत असते.
8) अध्यापनात माझे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यादा वर्गाच्या आयोजन पण केले जाते.
9) शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जातात.
10) दैनिक पालकांचा संपर्कात शिक्षक असतात.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल भैसारे , सदस्य खलिप घुटके, मिहीर फाउंडेशनच्या सचिव डॉ.मृणाली मेश्राम शितल सहारे शोभा झाडे, उत्तरा कोहपरे , प्राजक्ता पायघन, नगरपरिषद शिक्षण विभाग प्रमुख संपदा धनगुण, सोनिया मांढरे, शिक्षिका रेखा बोभाटे, कविता खोब्रागडे, वंदना गेडाम, रंजना सडमाके निशा चावर अनिल खेकारे कपिल देव मशाखेत्री, संदीप मेश्राम, ओम प्रकाश पुराम, वैशाली पिंपळ शेंडे पुजा गायमुखे, वैशाली साखरे शाळा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला व पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते.आय एस ओ मानांकनाबाबात मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले.