गडचिरोली नगर परिषदेचे आरक्षण जाहिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, ता. १३ जून : आज येथील नगर परिषद कार्यालयात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण २७ सदस्यांमध्ये १४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.

नव्या रचनेत गडचिरोली नगर परिषदेत एकूण १३ प्रभाग

आणि २७ सदस्य असणार आहेत. प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये प्रत्येकी दोन, तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये ३ सदस्य राहतील. आज काढण्यात आलेल्या सोडतीनुसार, प्रभाग क्रमांक १: अनुसूचित जाती (सर्वसाधारण), खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक २: अनूसचित जमाती (सर्वसाधारण), खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ३: खुला प्रवर्ग (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ४: अनुसूचित जमाती (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ५: अनुसूचित जाती (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ६: खुला प्रवर्ग (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ७: अनुसूचित जाती (सर्वसाधारण), खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ८: खुला प्रवर्ग (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ९: खुला प्रवर्ग (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १०: अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ११: अनुसूचित जमाती (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १२: खुला प्रवर्ग (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनुसूचित जाती (महिला), खुला प्रवर्ग (महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण) असे आरक्षण असणार आहे.

gadchiroli nagar parishadlead news