लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेल लगत असलेल्या अबूजमाड जे नक्षल्याचं गड म्हणून ओळखले जाते अशा अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात सुरक्षा यंत्रणांनी मोठं पाऊल उचललं आहे. भामरागड उपविभागातील बंगाडी या गावात अवघ्या 24 तासांत नवीन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलं आहे.
छत्तीसगड सीमेपासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात सुमारे हजाराहून अधिक पोलीस जवान, C-60 कमांडो, CRPF आणि विशेष पथकांच्या मदतीने ही उभारणी करण्यात आली आहे.
या नव्या केंद्रामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला बळ मिळण्याबरोबरच विकासकामांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भामरागड उपविभागातील बंगाडी हे gav छत्तीसगड सीमेच्या जवळ असलेलं आणि नक्षलविरोधी दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण…याच भागात गडचिरोली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने अवघ्या 24 तासांत पोलीस मदत केंद्र उभारलं आहे…या उभारणीत सुमारे 1000 पेक्षा अधिक जवान, C-60 कमांडो, बीडीडीएस पथक, CRPF आणि विशेष अभियान पथकांचा सहभाग होता…
केंद्रात पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, जनरेटर शेड आणि सुरक्षा व्यवस्थेची सुविधा उभारण्यात आली आहे…
या निमित्ताने आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना विविध जीवनावश्यक साहित्याचं वाटपही करण्यात आलं…2023 पासून सुरू असलेल्या सुरक्षा बळकटीकरणाच्या साखळीत हे 11वं पोलीस मदत केंद्र असून, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र आता पोलीस मदत केंद्र पोलीस स्टेशनची उभारणी करून जवळपास नक्षल आता हद्दपारच झाले असून आता नक्षलमुक्त संपूर्ण होण्याची वाट सुखरूप पाहत आहेत. यामुळे या भागातील सुरक्षा पोकळी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.