गडचिरोली पोलीस दलाकडून हरवलेले आणि चोरीला गेलेले सुमारे 53 मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्द.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात, पोलीस दल 2 ते 8 जानेवारी दरम्यान रेझिंग डे सप्ताह साजरा करत आहे. या अंतर्गत लॉस दलाकडून विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जातं आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली सायबर गुन्ह्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जातं आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते यावेळीहरवलेले आणि चोरी झालेले सुमारे 53 मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आले.

जिल्ह्यात हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनच्या तक्रारी, विविध पोलीस स्थानकांच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जातात. सायबर पोलीस दल तांत्रिक कौशल्यांचा वापर करून या मोबाईलचा तपास केला जातो. गेल्या वर्षी पोलिसांना एकूण 119 मोबाईल फोन चा शोध घेण्यात यश आलं असून, त्यांची किमत सुमारे 19 लाख 31 हजार 912 रुपये आहे. तसंच सप्टेंबर ते डिसेम्बर या चार महिन्यात सुमारे 53 मोबाईलचा शोध घेण्यात आला. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे आठ लाखाहून अधिक आहे. या तक्रार धारकांना पोलीस स्थानकात बोलवून त्यांना फोनची ओळख पटवून सुपूर्द करण्यात आले.

सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असून, लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. सोबतच डिजीटल अरेस्ट आणि आर्टीफिशीयल इंटीलेजन्सच्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशिल फोटोंना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जातं आहे, त्यामुळे नागरिकांनी सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहण्याचं आवाहन निलोटपल यांनी यावेळी बोलताना केलं आहे. आपली ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक झाली असल्यास 1930 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, तसंच मोबाईल चोरी झाला असल्यास तत्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, मपोउपनि नेहा हांडे व वर्षा बहिरवार, सगनी दुर्गे, संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार यांनी पार पाडली.

gadchiroli policemobile chori