दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

शासनाने जाहीर केले होते दोघांवर १४ लाखाचे बक्षीस.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली जिल्हातील धानोरा उपविभागात असलेल्या सावरगाव पोलीस मदत केंद्र हद्दीतील जंगल परिसरात चकमक उडाली असून दोन नक्षल्यांना ठार केले आहे. यात एक महिला व एक पुरुष जहाल नक्षलवाद्याच्या समावेश आहे. नक्षल फेब्रुवारी ते १५ जून पर्यंत नक्षलवादी टीसीओसी या योजनेखाली घातपात करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र येऊन घातपात घडवीत असतात.

                                            नक्षल्यांचे शस्त्रसाठा व साहित्य

 

अशीच घटना घडविण्याच्या उद्देशाने धानोरा तालुक्यात घातपात घडविण्यासाठी ४५ ते ५० नक्षलवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांना माहिती होताच यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वात रणनीती आखून आज मोरचुल जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना सकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या ४५ ते ५०  नक्षलवाद्यांनी c-६० जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानाच्या दिशेने गोळीबार केला. जवानानेही प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला यावेळी चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

चकमकीनंतर जंगल परिसरात सी-६० जवानी शोध अभियान राबविले असता दोन जहाल नक्षलवादी निपचित पडलेल्या अवस्थेत मिळून आले. त्यांना गडचिरोली येथे आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मृतांमध्ये एक पुरुष व एक महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या नक्षलवाद्यांचे नावे राजा ऊर्फ राम साई लोहरू मडावी (३०) रा. मोलचुर ता. धानोरा चा टिपागड एरिया कमेटी प्लाटून क्रमांक १५ चा कमांडर पदावर कार्यरत होता. रानिता उर्फ पुनिता चिपळूराम गावडे (२८) रा. बोटेझरी, ता. धानोरा येथील आहे. ती कसनसूर एलओएस या पदावर कार्यरत होती.

शासनाने राजा उर्फ रामसाई मोहरू मडावी यांच्यावर १२ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते, तर रणीता और पुनिता चिपळूराम गावडे यांच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दोघांवर असे एकूण १४ लाखांचे बक्षीस होते.

शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळावर १ एसएलआर रायफल, कुकर बॉम्ब व आईडी असे स्फोटक साहित्यासह नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी असल्याची शक्यता आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे कौतुक पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले, करावा लागला पदाचा त्याग

अहेरीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे महागाईच्या विरोधात आंदोलन

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

gadchiroli policelead story