गडचिरोली पोलिसांच्या धडक कारवाईत दारू तस्कराकडून ५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३ मार्च: गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात चारचाकी गाडीतून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यां दोघां युवकांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. हि कारवाई मंगळवारी संध्यकाळी करण्यात आली.  

चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे अवैध दारुचा पुरवठा करण्यासाठी आरमोरी ते गडचिरोली मार्गे चारचाकी वाहनातुन दारूची वाहतूक होत असल्याचा सुगावा लागला. त्यानुसार गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. दामदेव मंडलवार व पथक यांनी आरमोरी ते गडचिरोली मार्गावर विविध ठिकाणी गोपनियरित्या सापळा रचुन अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर पाळत ठेवली. अवैधरित्या दारुची वाहतुक करीत असलेले वाहन गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात पोहचताच वाहनाची झडती घेवुन, अवैध दारु वाहतुक करीत असल्याची खात्री करुन चारचाकी वेगन वाहन क्र. एम.एच. ०१ एव्ही/२८४८ यामधुन ९० एम.एल. क्षमतेच्या सुपर सॉनिक रॉकेट संना कंपनीच्या १,४२० सिलबंद निपा अंदाजे किंमत ८५,२००/- रूपये एक जुने वापरती चारचाकी वाहन क्र. एम.एच. ०१ एकी/२८४८ अंदाजे किंमत ५ लाख रुपये असे एकुण ५,८५,२००/- रूपयेचा मुद्देमाल जमा करण्यात आला असुन, यातील आरोपी क्र. ०१) अभिषेक अमर रामटेके वय २४ वर्ष रा. पाहरणी ता, नागभीड जिल्हा चंद्रपूर ०२) शेखर तफन सरकार वय २० वर्ष रा. गौरनगर ता. अर्जुनी (मोर.) जि. गोंदीया यांचे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोनि दामदेव मंडलवार, पोस्टे गडचिरोली, पोउपनि स्वप्निल गोपाले, आत्माराम गोन्नाडे, रमेश उसेंडी, चंद्रभान मडावी, शिवदास दुर्गे, शिला कुकूडकर, वनिता धुर्वे या दारूबंदी पथकाने केली असुन अवैद्य दारूची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करणाऱ्या या पथकाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असुन, अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यवसायीकाविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

smugling wine bottles