दुर्गम भागातील ज्येष्ठांसाठी गडचिरोली पोलिसांची नवी उड्डाण

१३०० ज्येष्ठांची तपासणी, २०७ ला योजनांचा लाभ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरण तपासणी शिबिर आयोजित करून मानवी सेवेचा नवा आदर्श घालून दिला आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ‘एलिम्को, मुंबई’च्या सहकार्याने ११ व १२ सप्टेंबर रोजी गडचिरोली व प्राणहिता येथे हे दोन दिवसीय शिबिर घेण्यात आले.

या उपक्रमात दुर्गम व अतिदुर्गम गावांतील तब्बल १३०० ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली. यापैकी २०७ नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड आदी शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाला. तपासणीअंती आवश्यकतेनुसार व्हीलचेअर, वॉकर, श्रवणयंत्र, काठी, कुबडा, कमरेचा पट्टा यासारखी सहायक उपकरणे मोफत देण्यात येणार आहेत.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, आवश्यक उपकरणे व शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याने ज्येष्ठांचे जीवनमान उंचावेल. दुर्गम भागातील प्रत्येक ज्येष्ठाला ही मदत मिळवून देण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे.

या शिबिरात अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, वैद्यकीय अधिकारी व एलिम्कोचे तज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी व नागरी कृती शाखेने विशेष प्रयत्न केले.

Dada loka khidakigadchiroli police
Comments (0)
Add Comment