लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 15 फेब्रुवारी: आज जिल्हयात 9 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9412 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9282 वर पोहचली. तसेच सद्या 25 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.62 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.27 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.
नवीन 9 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 8 जणाचा समावेश आहे. तर वडसा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे आज कोरोनामुक्त झालेल्या 4 रूग्णांमध्ये गडचिरोली 3, कोरची 1, जणाचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील स्नेहनगर 2, पंचवटी नगर 4,आयटीआय चौक 1, नवेगाव 1, वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक 1, तर इतर जिल्हयातील 0, बाधिताचा समावेश आहे.