ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, आमदार निधीतून २० लाख रुपये गावच्या विकासासाठी मिळवा

भाजप आमदार नारायण कुचे यांची मतदार संघातील ग्रामपंचायतींसाठी घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

जालना, दि. १९ डिसेंबर: सध्या जिल्ह्या-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचं वारं वाहायला सुरुवात झालीय. जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील ज्या गावच्या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होईल, त्या गावांच्या विकासासाठी २० लाख रुपये देण्यात येईल,अशी घोषणा बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलीय.

गावाच्या निवडणुका बिनविरोध करा असे आवाहन जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी केलंय,वादविवाद टाळण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत होणाऱ्या वादाची कल्पना गेल्या 5 ते 6 वर्ष्यापासून आली होती,घरातल्या घरात लोक एकमेकांविरोधात उभे राहतात आणि वाद निर्माण होतो,म्हणून मी सुचविले की ज्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील त्या गावाला 20 लाख रुपय त्या गावाच्या विकासासाठी स्वतःच्या आमदार फंडातून देणार असून यातून गावाचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी म्हटलंय, स्थानिक विकास निधीतून ही रक्कम दिल्या जाईल अशी माहितीही कुचे यांनी दिलीय.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संबंधित ग्रामपंचायतींची घोषणा करून आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित गावात विकास कामं सुरु केल्या जाईल असंही कुचे यांनी म्हटलंय.