मेळघाटात भरला घुंगरू बाजार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अमरावती, दि. 21 नोव्हेंबर: जिल्ह्यातील मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्य करीत आहेत. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करताना हे आदिवासी बांधव पायात घुंगरू बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन नृत्य दीपोत्सवाचे स्वागत करतात.आज मेळघाटातील धारणी येथे घुंगरू बाजार भरला होता

आदिवासी समाजातील पुरुष मंडळी विशेष पोषाखात घुंगरू बाजारात येतात. पांढरा सदरा, पांढरी धोती, काळा कोट, डोक्यावर काळा चष्मा, हाता काठी, बांसरी आणि डोक्यावर तुरेदार पगडी हा विशेष आकर्षण ठरतो. त्याचेसोबत ढोल, टिमका, आणि बासुरीसह म्हशीचा सिंगाचा वाजणारी पुंगी व सर्वांनी मिळून लयबध्द केलेले गोंडी नृत्य करतात. गोंडी नृत्य करताना त्यांच्यात दोन लोकांजवळ कापडाची झोळी घेऊन बक्षीस मागणारे असतात.

वर्षभर जनवारे चारल्यामुळे वर्षातून एकदा आपला हक्काने बक्षिसांचा स्वीकार करतात. यात रोख रकमेसह जे काही दुकानातील सामान दिले जाते, त्याचा स्वीकार प्रेमाने केला जातो. पुढील आठ दिवस घुंगरू बाजाराचा आनंदोत्सव पहावयास मिळणार आहे, सातपुड्याच्या शेवटचे टोक म्हणजे मेळघाट. ७ टक्क्यांहून अधिक वन असलेल्या मेळघाटात पुरातन काळापासून आदिवासींच्या विविध जमाती वास्तव्यास आहे. शहरी संस्कृतीपासून लांब राहणाºया या आदिवासी बांधवांनी आपली स्वतंत्र परंपरा व संस्कृती जतन केली आहे.