यवतमाळ, दि. १९ जानेवारी: यवतमाळ येथील नेताजी नगरातील सार्वजनिक शौचालय अनेक दिवसांपासून बंद आहे. या भागातील नागरिक आर्थिक दुर्बल आहेत. जागे अभावी त्यांना शौचालय बांधता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात .गेली कित्येक महिन्यापासून शौचालयाची स्वच्छता करण्यात आली नाही .पाणी आणि वीज पुरवठा बंद आहे यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते, या समस्येला घेऊन लोकप्रतिनिधींकडे आणि पालिकेकडे अनेक वेळी तक्रारी करण्यात आल्या.
यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही . यायचा राग धरून स्वाभिमान कामगार संघटनेने चक्क पालिका मुख्याधिकाऱ्याला टॉयलेट सीट देऊ आपला निषेध व्यक्त केला. निदान आतातरी पालिका सार्वजनिक शौचालय सुरु करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .