नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तहसील कार्यालयवर हल्लाबोल, ब्रम्हपूरी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकार्यांना प्रेषित केले निवेदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ब्रम्हपूरी, 19, ऑक्टोबर :- ब्रम्हपूरी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. धान व इतर पिके पाण्यात बुडाल्याने नापिकीसदृश्य स्थिती निर्माण झाली. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला. या परिस्थितीची दखल घेत शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली. सर्वेक्षणानंतर अनेक शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. मात्र, काही शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. सर्वेक्षणानंतर सुध्दा त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणी करीता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज ब्रम्हपूरी तहसील कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी विभिन्न मागणीचे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या नेतृत्वात तहसीलदार उषा चौधरीच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना प्रेषित करण्यात आले.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत ब्रम्हपूरीच्या तहसीलदार उषा चौधरी यांनी मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांना त्वरीत सर्वेक्षणाचे आदेश दिले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख केवळराम पारधी, माजी शहर प्रमुख शामराव भानारकर, रमाकांत अरगेलवार, गुलाब बागडे, विनोद राउत, देवदास पिसे, सतिश पिसे, नरहरी जेंगठे, सिध्दार्थ बनकर, रविंद्र शेंडे, छत्रपती दिगोरे, गणेश बागडे, मनोहर लेनगुरे, गुलाब मेश्राम सह शिवसैनिक व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

compensationFarmers