लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : धानोरा व आरमोरी तालुक्यातील जंगल परिक्षेत्रात वाघ, बिबट्याची दहशत आहे. सध्या खरीप हंगामातील धान पीक कापलेले असून धान बांधण्यासाठी शिंधीच्या पानांना मागणी आहे.
चातगाव जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शिंधीची झाडे आहेत. धानाचे भारे बांधण्यासाठी शिंधीच्या पानांचा उपयोग केला जातो. ही पाने तोडण्यासाठी जंगलात जाताना काळजी घेण्याची गरज आहे. ही पाने तोडण्याची शेतकऱ्यांत लगबग आहे. मात्र, याच जंगल परिसरात वाघ, बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. त्यामुळे हल्ला होऊन शेतकऱ्यांच्या जीवितास धोका पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.
यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाआहे. त्याशिवाय, पशुधनालाही धोका पोहोचला होता. अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी जंगलात जावे. जंगलात जात असताना समुहाने एकमेकांसोबत जोरजोराने गप्पा मारत जावे तसेच अधूनमधून जोराने ओरडावे. एकत्रित काम करावे, असा सल्ला वनविभागाने दिला आहे.
हे पण पहा,