गोलमाल है भाई यह सब गोलमाल है !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 17, सप्टेंबर :- सध्या महाराष्ट्रात फक्त एकाच विषयावर चर्चा होत आहे, तो म्हणजे वेदांता-फॉक्सकॉन चा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला कसा गेला? तो कुणी नेला ? त्यात कोणत्या सरकारची चुकी ? यावर सध्या काथ्याकूट सुरू आहे. आता या चर्चेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विट ने आणखी भर टाकली आहे. काय म्हटलं आहे त्या ट्विट मध्ये आशिष शेलारानी.

गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणी विविध सवलती , अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी १० टक्के लाच द्यावी लागत होती.इतका भ्रष्टाचार बोकाळला , असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला. वेदांता फॉक्सकॉन चा प्रकल्प दीड लाख कोटींचा होता, मग इथं किती टक्के मागितले होते,? ,१० टक्क्यांनुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतल्या रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है । याची चौकशी झाली पाहिजे. जनतेसमोर सत्य यायलाच हवं .
यांच्या या ट्वीट मुळे पुन्हा एकदा शेलार यांनी चेंडू तत्कालीन मविआ सरकारच्या कोर्टात पाठवून पलटवार केला।आहे.

हे देखील वाचा :-

शिवाजी पार्क यावर्षी कुणाला ?

mumbaisemiconductor chipVedanta foxconn project