बेघर निवारा गृहात अंध जोडप्याचे शुभ मंगल

जालन्यात आपुलकीचा अनोखा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना : शहरातील कैलास ब्रिगेड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात आलेल्या अंध जोडप्याचा संस्थेचे अध्यक्ष अरुण सरदार आणि सचिव वैशाली सरदार यांच्या पुढाकारातून आज विवाह लावण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील माया कांबळे आणि बीड जिल्ह्यातील शाम तांबे हे दोघेही अंध असून रेल्वेत खेळणी विकतात. त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली होती. परंतु कोरोना काळात रेल्वे बंद असल्याने त्यांनी जालना शहरातील आपुलकी बेघर निवारा केंद्रात आश्रय घेतला होता.

दरम्यान त्यांच्या मैत्री बाबत माहिती होताच कैलास ब्रिगेडचे अरुण सरदार आणि वैशाली सरदार यांनी त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. दोघांनीही संमती दिल्यानंतर आज 16 जुलै रोजी विविध संस्था, प्रतिष्ठित नागरिक, विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह करून देण्यात आला. या विवाहाला जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. विवाहानंतर वधू-वरांनी कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्थेचे आभार मानले आहेत.

हे देखील वाचा :

मुंबईत रात्रभर पाऊसाने मध्य रेल्वे ठप्प, रस्ते वाहतुकीवर ही पावसाचा परीणाम

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

 

 

lead story