खुशखबर… उद्यापासुन अहेरी येथील कन्यका परमेश्वरी देवस्थानात 18+ लसीकरण केंद्र होणार सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ३ मे: अहेरी तालुक्यात लसीकरणाच्या तिसर्‍या टप्पाला सुरुवात झाली आहे. १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ऊद्यापासुन अहेरी येथील कन्यका परमेश्वरी देवस्थान येथे लसीकरण केंद्र सुरु होणार आहे.

नुकतेच आर्य, वैश्य, कोमटी समाजाने कोरोना संकटात आरोग्य विभागाला समाजातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवीली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने ह्या ठिकाणी लसीकरण केंद्राला मंजुरी दिली आहे.

लसीकरणाला येण्यापुर्वी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. केवळ नोंदनीकृत नागरीकांचेच लसीकरण होईल. ही मोहीम निशुल्क असणार आहे.

Aheri