लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, दि. २० ऑगस्ट : युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो.या निमित्त पालघर शहरात सकाळी, ८ वाजता सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी व शिक्षणाधिकारी, जिल्हा परीषद आणि भारत स्काऊट्स गाईडस यांच्या वतीने सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व शहरातील नागरिकांसाठी सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते
सद्भावना दौड ३ कि.मी.ची होती. पालघर जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परीषद कार्यालय ते परत जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा क्रीड़ा अधिकारी सूहास व्हनमाने, प्रकाश वाघ, सरिता वळवी, तेजश्री पाटील, चेतन मोरे, रोहीत बारी, स्काउट गाइड च्या विद्या भदाने, गावीत,.भोईर, श्रीमती. ठाकुर, स.तु. कदम महाविद्यालयचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा :
नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची संवेदनशीलता