गोसावी महाराज गडपायले यांचे दुःखद निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी :  तालुक्यातील आकापुर येथील रहिवासी हरिभक्त परायण गोसाई महाराज गडपायले यांचे नुकतेच वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

गोसाई महाराज गडचिरोली जिल्ह्यात व इतर परिसरात सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध होते. तसेच ते उत्कृष्ट भजन सुद्धा गात होते.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या घडणीत गोसाई महाराज गडपायले घडले. आकापुर, किटाळी, चुरमुरा, देऊळगाव, डोंगरगाव, इंजेवारी या गावांमध्ये ते प्रामुख्याने सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी जात होते. या गावात त्यांचे नावलौकिक होते.

सत्यनारायणाची पूजा करणारे आणि उत्कृष्ट भजन गाणारे महाराज गोसावी महाराज यांचे निधनाने  संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

 

हे देखील वाचा :

छत्तीसगडमधील CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, 3 जणांचा मृत्यू

मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा ! भारतीय जहाज पी-३०५ समुद्रात बुडालं

Gosai Maharajlead story