लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
धानोरा: – गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली २१ फेब्रुवारी रोजी पार पडला. टीपागड गुरूबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) असं या संस्थेचं नामकरण करण्यात आलं.
या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक लालाजी उसेंडी यांनी केलं. यावेळी पत्रकार बडोले, पंचायत समिती माजी सदस्य चंदू पाटील किरनगे, आयएमसी सदस्य मुश्ताक कुरेशी, विनोद नवले, तसंच संस्थेचे प्राचार्य मिलिंद लोने यांच्यासह सहप्राचार्य आनंद मधुपवार इतर कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संस्थेतले एस.बी. देशपांडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सह प्राचार्य मधुपवार, रामटेके बाबु, यत्तेवार बाबू, मशाखेत्री सर, पिंटू सर तसंच इतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.