महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक पीएफएमएस या परिपत्रकाला डावलून नियमाचे उल्लंघन – संतोष ताटीकोंडावार

जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांचे जि. प. गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   

अहेरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक PFMS (Public Financial Management System) या परिपत्रकाला डावलून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी शासन परिपत्रकाच्या नियमाचे पालन न करता ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामावरील देयक PFMS च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे न करता परस्पर निधीचे धनादेशाद्वारे वितरण केलेले आहे.

यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी आढळलेल्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशा मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी जि.प. गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविलेले निवेदनातून केली आहे.  

निवेदनात म्हटले आहे की, पीएफएमएस या शासन परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, कोणतेही विकास कामे करण्यास व खरेदी करण्याकरिता पीएफएमएस च्या डीएससी मधून ऑनलाईन देयक वितरण करणे अनिवार्य आहे. असे स्पष्ट नमूद असून सुद्धा अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील काही ग्रामसेवकांनी परस्पर निधी धनादेश द्वारे वितरण करून आपले तालुका स्तरावरील विस्तार अधिकाऱ्यांचा मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मंजुरीस्तव विस्तार अधिकाऱ्यांचा मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मंजुरीस्तव प्रस्ताव पाठवलेले आहे.

सदर प्रस्तावास मंजुरी न देता शासन परिपत्रक PFMS चे नियमाचे अधीन राहून दोषी असलेल्या ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. असेही निवेदनात म्हटले आहे.

हे देखील वाचा :

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, गडचिरोली-चामोर्शी मार्गाला अल्पावधीतच तडा

आलापल्ली-सिरोंचा रस्त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करा – संतोष ताटीकोंडावार यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन

अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

kumar Ashirwadlead storySantosh Tatikondawar