लसीकरण जनजागृती सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज चे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. २६ मे : लसीकरण जनजागृती सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षक वृंदाना ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून त्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, ग्राम विकास अधिकारी आलापल्ली संध्या गेडाम यांच्या हस्ते भाग क्रमांक १२६ मध्ये सर्वेक्षण सुरू असताना भेट देऊन सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन करून सरस्वती अर्का, सुमित्रा दहागावकर व श्रीनिवास कोंन्ड्रा याना मास्क, सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोजइ साहित्याचे वितरण करण्यात आले.

भाग क्र. १२६ मध्ये साहित्य वितरण करत असताना.जगदीश बोम्मावार केंद्रप्रमुख आलापल्ली, मुकुंद सडमेक मुख्याध्यापक कन्याशाळा आलापल्ली व अजय सोनलवार मुख्याध्यापक मुलांची शाळा आलापल्ली उपस्थिती होती.