ग्रामसेवक प्रकाश पत्रे एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. ८ एप्रिल: तालुक्यापासून ४ किमी अंतरावर असलेल्या नवरगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रकाश नानाजी पत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली चे अधिकारी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

सविस्तर माहिती अशी आहे की, रामलाल माकडे या कंत्राटदाराने ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत विहीर ची कामे केली होती. त्याचा रू.. ८००० चा बील काढायचा होता. कंत्राटदार रामलाल माकडे यांनी बील काढण्यासाठी बऱ्याच वेळा ग्रामसेवक प्रकाश पत्रे यांना मागणी केली होती. बील आज काढू उद्या काढू म्हणून वेळ काढून देत नव्हते. त्यामुळे त्रस्त झालेल्या माकडे यांनी सदर प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांना दिली. त्या तक्रारी नुसार आज सापळा रचून ग्रामसेवक प्रकाश पत्रे यांनी मागितलेली रू ८००० त्याच्या हातात देऊन त्यांना रंगेहाथ पकडले.

ग्रामसेवक प्रकाश पत्रे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन कोरची येथे लाचलुचपत प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला.

ACB