अहेरीत गटसाधन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग दिनानिमित्त भव्य रॅली

अहेरीत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी विविध शाळांचा सहभाग....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

अहेरी दि,4 डिसेंबर : दिव्यांग दिनानिमित्त स्थानिक विविध शाळांनी सहभाग नोंदवून रॅली काढून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.यावेळी अहेरीचे तहसीलदार सुनील संदाने, गट शिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांनी यावेळी मुख्य भूमिका बजावली.

भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणपत मेश्राम, धर्मराव कृषी विद्यालयाचे प्राचार्य अनिल भोंगळे, समन्वयक तरडे आणि संत मानवदयाल आश्रम शाळेचे मुख्याध्यापक वितोंडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि गटसाधन केंद्रातील समावेशित शिक्षण समूहासह संपूर्ण कर्मचारी सहभागी झाले होते. संत मानवद्याल आश्रम शाळा, भगवंतराव हायस्कूल ,धर्मराव कृषी विद्यालय व चंद्रभागाबई ल. मद्दीवार उच्च प्राथमिक शाळा तसेच संत मानवदयाल हायस्कूल इत्यादी शाळांनी सहभाग घेतला होता.

रॅलीचा आरंभ भगवंतराव हायस्कूल येथून दानशूर चौक ते शहरातील मुख्य चौकातून संत मानवदयाल आश्रम शाळा येथे समारोप करण्यात आले. समरोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे होते तर समारोपाचे आयोजक म्हणून प्राचार्य वितोंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्राचे किशोर मेश्राम, जितेंद्र राहुड ,राजू नागरे , ताराचंद भुर्से, ज्ञानेश्वर कापगते यांनी सहकार्य केले.

अहेरीचे तहसीलदार सुनील संदानेगट शिक्षणाधिकारी धनंजय कांबळे