माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेतली हरित शपथ – डॉ . कैलास व्ही. निखाडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भामरागड, दि. ८ जानेवारीयेथील राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालया मध्ये भूगोल विभागाच्या वतीने पर्यावरण मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरित शपथ घेण्यात आली.

पुथ्वीवरील संसाधनाचा सुयोग वापर, पाण्याचा काटकसरीने वापर,  वृक्ष लागवड व संगोपन, घनकचरा व्यवस्थापना याबद्दल जागृती निर्माण करणें यासाठी सतत कार्य करणारे पर्यावरण प्रमुख व जलदुत डॉ. कैलास निखाडे यांनी प्राध्यापक व शिक्षकेत्त्रर कर्मचारी यांना शपथ देऊन  ई सर्टिफिकेट देण्यात आले . प्रत्येक विध्यार्थीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली.

     या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा. डॉ. संतोष डाखरे, प्रा. डॉ. सुरेश डोहणे तसेच  श्री. प्रशांत आगलावे, बंडू बोढे,  सुनील ताजने, विवेक येरगुडे उपस्थित होते.

राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय