गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटपा करिता अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 07 जुलै : गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप करणे या योजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल व रु. 500/- इतके रोख अनुदान देणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज मागण्यात आले आहेत.

या योजनेत अर्जदार हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. व गटई कामगार असावा, अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात रु. 40,000/- व शहरी भागात रु.50,000/- पेक्षा अधिक नसावे .

(यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील) , अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत , नगरपालीका, छावणी बोर्ड, (कॅन्टॉन्मेंट बोर्ड ) किंवा महानगरपालीका यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी.

याबाबत अधिक माहितीकरीता व अर्जाकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली कार्यालयाशी संपर्क करण्यात यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप

एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या; मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

 

lead story