पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोज

शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोर येऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. 4 जून : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेतला.

लसीकरण केल्यानंतर पालकमंत्री म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तयार केलेली लस अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे. तसेच ही लस कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र असून याचे कोणतेही दुष्परिणाम निदर्शनास आले नाही. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोर येऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

 

हे देखील वाचा : 

पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्यात आज 27 कोरोनामुक्त,150 पॉझिटिव्ह तर 5 जणांचा मृत्यू

lead storyVijay Wadettiwar