प्रतिपालकत्व योजनेचा लाभ घ्यावा-जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 04 मार्च: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाकडून अनाथ, निराधार, मुलांना कुटुंबाचे प्रेम, आधार, वात्सल्य, मिळावे म्हणून प्रतिपालकत्व ही योजना जाहिर करण्यात आली आहे. प्रतिपालकत्व ( Foster Care) या योजनेचा महाराष्ट्र राज्यात प्रायोगिक तत्वावर गडचिरोली या जिल्हयांचा समावेश आहे.

प्रतिपालकत्व ही योजना अनाथ, निराधार बालकांना कुटुंब मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. बालकांचा सर्वांगिन विकास व बालकाघ्यावा-
कुटुंबात असुन अनाथ व निराधार बालकांना कुटुंब मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाकडुन हि योजना अंमलात येणार आहे. प्रतिपालकत्व योजनेअंतर्गत इच्छुक कुटुंबाना व अनाथ व निराधार बालकांना तात्पुरत्या स्वरुपात साभांळ करता येणार आहे. प्रतिपालकत्व योजनेसाठी प्रत्येक जिल्हयातील फक्त 40 बालकांची निवड केली जात आहे. बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 च्या कलम 44 नुसार प्रतिपालकत्व योजनेची तरतुद केली आहे.
तरी इच्छुक कुटुंबांनी www.wcdcommpune.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत . प्रतिपालकत्व योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या इच्छुक कुटुंबांनी अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बॅरेक क्र. 1 खोली क्र. 26,27 कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले , मो. क्रमांक 9403704834 व संरक्षण अधिकारी कु.प्रियका आसुटकर मो. क्रमांक 9975033601 , यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन क्रमांक -07132-22264 वर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नारायण परांडे यांनी केले आहे.