हिवाळ्यात डिंकाचे लाडू फायदेशीर

हिवाळ्यात घ्या आरोग्याची खास काळजी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी अद्भवतात. तापमानात घट झाल्याने सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित आजार होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

हिवाळ्यात योग्य आहार महत्वाचा असतो. काय खावे आणि काय खाउ नये, याचे नियोजन करणे गरजेचे असते. हिवाळ्यात डिंकाचे लाडूू खाणे फायदेशीर ठरते. डिंकामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. हिवाळ्यात डिंकाचे सेवन आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. आजीबाईच्या बटव्यात नेहमी डिंकाचा लाडू पहायला मिळतो. कारण डिंक आरोग्यासाठी उत्तम असतो.

डिंकाच्या लाडूचे फायदे

डिंक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्याने रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. या डिंकाच्या लाडूंमुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आरोग्याचा फायदा होतो. ते खाल्ल्याने शरीरात उब निर्माण होते. डिंक हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. डिंकाचे लाडू खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे स्नायूही मजबूत होतात. स्तनपान करणार्या महिलांसाठी डिंक फायदेशीर आहे. गरोदर महिलांसाठी डिंकाचे लाडू देखिल फायदेशिर मानले जातात.

दरम्यान डिंक, नारळ, पंजिरी, खसखस आणि पीठ मिसळून लाडू आणि चिक्की बनवता येतात. तुपापासून बनवलेले हे लाडू शरीराला मजबूत बनवण्याचे काम करतात. हिवाळ्यात पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी. आहारामध्ये पौष्टि पदार्थांचा समावेश करावा. ज्या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होईल.

हे देखील वाचा :-

एका दहशतवाद्याचा खात्मा !

भारतीय चलनांमध्ये गांधी सोबत गणपती आणि लक्ष्मीचा हवा फोटो

are beneficialGum ladlesin winter