मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. ६ जून : युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.

हे देखील वाचा :

मुख्यमंत्र्यांनी साधला चित्रपट-टीव्ही मालिका निर्मात्यांशी संवाद

स्पुतनिक लसीच्या साठा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार : राजेश टोपे

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी करणार आंदोलन