परिश्रम व जिद्द हीच यशाची गुरुकिल्ली; ३७ बटालियन कमांडेंट मोहनदास खोब्रागडे यांचे प्रतिपादन

केंद्रीय राखीव पोलीस दल, ३७ बटालियन द्वारे नागरी कृती कार्यक्रम अंतर्गत एक अद्भुत उपक्रम...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सिविक ॲक्शन प्रोग्राम अंतर्गत 37 बटालियन, केंद्रीय रिजर्व पोलीस दलद्वारा लक्ष अकॅडमी मार्फत भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम, अतीसवेंदशिल, नक्षलग्रस्त भागातील गरजू तसेच पदवी प्राप्त झालेल्या 20 युवक – युवतींची निवड करून भरतीपूर्व प्रशिक्षण देवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कमांडेंट एम एच खोब्रागडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून पदवी प्राप्त युवक – युवतींना प्रशिक्षणात सामील करून मार्गदर्शन करीत उपस्थित असलेल्या  सर्व युवक- युवतीना स्पर्धा परिक्षेकरिता पुस्तकांचा संच व आवश्यक वस्तु तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्यां युवक- युवतींना प्रमाणपत्र देण्यात आले.

गडचिरोली दि 22 : भामरागड तालुक्यातील युवक – युवतींच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याहेतू दि, २०/११/२०२३ ते १९/१२/२०२३ या कालावधीत २० युवक-युवतींना एक महिन्याचे भरतीपूर्व प्रशिक्षण, लक्ष्य अकॅडमी मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अंतर्गत ३७ बटालियन द्वारे संचालित करण्यात आले होते. ज्या ची पूर्णता दिनांक २१/१२/२०२३ रोजी एम.एच.खोब्रागडे, कमांडेंट -३७ बटालियन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

यावेळी ३७ बटालियन कमांडेंट श्री.एम.एच.खोब्रागडे म्हणाले की, सर्व तरुणांनी आपले मनोबल वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे व कोणत्याही अपयशाने खचून न जाता त्या अपयशातून धडा घेऊन पुढे जावे. केंद्रीय सशस्त्र दलातील भरती आणि त्यासंबंधीची माहिती त्यांनी सर्वांना दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाला आशा आहे की तरुणांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आपल्या भागातील लोकांचा नक्षलवादापासून भ्रमनिरास करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात मदत होईल.

या कार्यक्रमाला लक्ष्य अकादमीचे संचालक सतीश पानगंटीवार, उपसंचालक विनोद दहागावकर, शिक्षक शुभम नीलम, सोनाली दुर्गे, अधिवक्ता पंकज दहागावकर, त्रिशूल डांगरे व ३७ बटालियनचे अधिनस्त अधिकारी व जवान उपस्थित होते.

३७ बटालियन कमांडंट श्री.एम.एच.खोब्रागडेअधिवक्ता पंकज दहागावकरउपसंचालक विनोद दहागावकरसतीश पानगंटीवार