लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंदिया : देवरी शहरातून गेलेल्या चिचगड मार्गावरील सालई परिसरातील अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण दुचाकी अपघात झाला होता. ज्यात दुचाकीचालकाचा धड वेगळा शिर झाल्याची घटना काल सायंकाळी 6:30 वाजता दरम्यान घडली होती.ज्यात वाहन (ट्रक्टर) चालक वाहनासह घटना स्थळावरुन पसार झाला होता. ज्यामुळे नागरीकांना घात की अपघात..? हा प्रश्न कायम पडला होता.
त्यावर दि.07 जानेवारी 2025 रोज मगंळवारला देवरी पोलिसांनी ट्रॅक्टर व चालकाचा शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, निकेश आत्माराम कहाडे (वय 32) रा. मोहगाव (आलेवाडा) ता.देवरी जि. गोंदिया हा दि. 06 जानेवारीला सायंकाळी 6:30 वाजता दरम्यान MIDC येथिल काम संपल्यावर आपल्या दुचाकीने ( दुचाकी क्र. MH 35 AV 2968) गावाकडे परत जात असतानां, टिनाचे सेट व ईतर साहित्य घेऊन जाणाऱ्या बिना नंबर प्लेटच्या ट्रक्टर ला देवरी पोलिस स्टेशन हद्दीतील चिचगड रोडवरील सालई गावाजवळ निकेशच्या दुचाकीने मागेहून जोरदार धडक दिली. हि धडक ईतकी भयानह होती की, निकेशच मुंडक धडापासुन वेगळ झाले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सदर घटना घडताच ट्रक्टर चालक हा घटना स्थळावरुन ट्रक्टर घेऊन पसार झाला होता. सदर घटनेतील वाहन (ट्रक्टर) चालकाचा बयान देवरी पोलिस घेत असुन ट्रक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास वरिष्ट अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.
हे ही वाचा,
गडचिरोली वनविभागाच्या नियोजनशून्यतेमुळे उद्यानाची लागली “वाट”