गडचिरोलीत “आत्मसमर्पित नक्षल सदस्यांचे आरोग्य शिबीर” संपन्न

  • गडचिरोली पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “आत्मसमर्पित नक्षल सदस्यांचे आरोग्य शिबीर” संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६ मार्च: गडचिरोली जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतुन कुमार आर्शिवाद (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली व समीर शेख (भा.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन), गडचिरोली यांचे उपस्थितीत नवजीवन वसाहत नवेगांव येथे जिल्ह्यातील आत्मसमीत नक्षल युवक-युवतींकरीता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

सदर आरोग्य शिबीरात आत्मसमर्पितांचे जीवनमान उंचावण्याकरीता तसेच त्यांच्या सार्वभौमीक विकास व प्रगतीसाठी जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्फत वेगवेगळया योजना राबविल्या जातात त्याचाच एक भाग म्हणुन “नवजीवन वसाहत” नवेगांव येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात १३० आत्मसमीत नक्षल सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला. यात B.P., शुगर, CBC- COUNT, LFT, KFT इत्यादी आजाराची तपासणी करुन त्यापैकी ०६ दिर्घ आजार असलेल्या आत्मसमर्पित सदस्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले.

सदर आरोग्य शिबीरादरम्यान आत्मसमीत नक्षल सदस्यांचे आरोग्य सुदृढ व तंदुरुस्त राहण्याकरीता तसेच त्यांचे जिवनमान उंचावण्या करिता जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधीकारी कुमार आशिर्वाद (भा.प्र.से.) यांनी आत्मसीत नक्षल सदस्यांना राहण्याची सुविधा, विज पुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीर व हातपंप, रोजगार, व्यवसायीक प्रशिक्षण, बचतगटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुण देण्याचे तसेच त्यांना खेळाचे मैदान व साहीत्य, शेतीसाठी प्रशस्त जागा, प्राथमीक आरोग्य केंद्र, त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन देणे तसेच नवजीवन वसाहत येथे आरोग्य, स्वच्छता आणि पाणिपुरवठा, महीला व बालकल्याण, शिक्षण, मुलभुत सुविधा, कौशल्य व रोजगार, तंटामुक्ती, वसाहत सुरक्षा दल, देखरेख व सु-शोभीकरण अशा एकुण ०८ समित्या स्थापण करण्यात आल्या असुन प्रत्येक महीण्यातुन एकदा आढावा बैठक गडचिरोली पोलीस विभागाच्या मदतीने आयोजीत करण्यात येईल अशी माहीती दिली. तसेच पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी आजपावेतो गडचिरोली पोलीस दलाचे वतीने आत्मसमपीत नक्षल सदस्यांना निवासाची, विद्युतीकरणाची, रोजगाराची, रोडची व्यवस्था केली असुन यापुढे त्यांना शिक्षण, आरोग्य तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास पोलीस दल सदैव तत्पर असल्याचे सांगीतले.

सदर आरोग्य शिबीरात मारोतरावजी इचोडकर, सभापती पं.स. गडचिरोली, मुकेश माहोर, गट विकास अधिकारी प. स. गडचिरोली., डॉ. सुनील मडावी, तालुका वैद्यकिय अधिकारी, पं.स. गडचिरोली, डॉ. मिलींद रामटेके मुख्य वैद्यकिय अधिकारी, पोलीस रुग्णालय, गडचिरोली, दशरथजी चांदेकर सरपंच ग्रा.पं. नवेगावमुरखळा, राजुभाऊ खंगार उपसरपंच ग्रा.पं. नवेगाव- मुरखळा, चेतना लाटकर मॅडम (MSRLM पदाधिकारी ) इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.सदर आरोग्य शिबीराच्या यशस्वीतेकरीता आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि गंगाधर ढगे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Naxal Health Programme