इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाबाबत आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 17 जून : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यासाठी इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्प उभारण्याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनात बैठक झाली. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाचे सादरीकरण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

या प्रकल्पाचा उद्देश स्तुत्य असून त्यामुळे एकाच ठिकाणी सर्वोच्च अशी आरोग्य उपचार सुविधा मिळण्यास मदत होईल. हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिकदृष्ट्या नियोजन करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

इंद्रायणी नदी काठी २४ विविध प्रकारच्या हॉस्पीटल असलेले मेडिकल टाऊनशीप उभारण्याची संकल्पना या प्रकल्पाची असून पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत त्याचे नियोजन आणि विकास केला जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी सादरीकरण केले. त्यावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली असून प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली.

बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे आदी यावेळी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

नवजात बालकांची श्रवण शक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिट चावापर पुणे, गडचिरोली आणि जालना येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

गीरगाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

दूरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानांची कामे तातडीने पूर्ण करावीत – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई

lead storyRajesh Tope