संजय राउत यांच्या जामीन अर्जावरील सुनवाणी आता 9 नोव्हेंबर रोजी

जेल मध्ये 7 दिवस वाढला राउंताचा मुक्काम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 02 नोव्हेंबर :- खासदार संजय राउत यांच्या जामीन अर्जावर आज 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ईडीच्या उत्तरावर न्यायालयाने आपला आजचा निकाल राखून ठेवला असून आता जामीन अर्जावर 9 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे अजून 7 दिवस जेलमध्ये राउतांचा मुक्काम वाढला आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राउत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने ईडीच्या उत्तरानंतर आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे संजय राउत यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. या आधी ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचा आहे असे न्यायालयाला सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने आजची तारीख दिली होती.

संजय राउत यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात 31 जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. सुरूवातीपासूनच राउत यांचा या घोटाळ्याशी कसलाही संबंध नाही असा युक्तिवाद त्यांच्या वकीलाने केला आहे. तर राउत हेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कसे आहेत, हे ईडीचे वकील न्यायालयाला पटवून देत आहेत.

दरम्यान, 7 सप्टेंबर रोजी राउत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र, तेव्हापासून न्यायालयाची तारीख पे तारीख सुरू आहे. राउतांना दिलासा मिळतांना दिसत नाही. राउतांच्या जामीन अर्जावर 11 आॅक्टोबरला सुनावणी झाली होती. मात्र, वेळेअभावी त्यांचा युक्तिवाद पूर्ण होउ शकला नाही. त्यामुळे सुनावणी 17 आॅक्टोबरला घेण्याचे सांगितले होत. मात्र, पुन्हा एक दिवसाने सुनावणी पुढे ढकलण्यात येउन 18 आॅक्टोबर ला घेण्याचा निर्णय घेतला होता. ती ही सुनावणी पूर्ण होउ नही झाली. त्यामुळे आज 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी झाली. पण ईडीच्या उत्तरानंतर राउतांच्या जामीन अर्जावर आता 9 नोव्हेंबरला सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा :-

BailRaut'sSanjay