लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली शहरासह जिल्ह्यात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच आकाशात ढग दाटले होते. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
सुमारे पंधरा मिनिटे जोरदार पाऊस कोसळल्याने शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना काही वेळासाठी अडचण निर्माण झाली होती.
दरम्यान, या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून सतावत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण असून हलक्या रिमझिम पावसाची संततधार सुरूच आहे.
हवामान विभागाकडून पुढील दोन ते तीन दिवस अजूनही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.