लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ डिसेंबर : देशाचे सरंक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर ला झालेला अपघात हे सर्वांसाठी धक्कादायक असून देशासाठी हा मोठा हादरा असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ते आज नागपूरात पत्रकारांशी बोलत होते.
या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे असून तथ्य बाहेर येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटके संदर्भात विचारले असता. कोणतेही कारण नसतांना अनिल देशमुख यांना अटकेत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर जे जे आरोप लावण्यात आले होते. त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे आता अनिल देशमुख यांना अटकेत ठेवन्याची आवश्यकता नसल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
हे देखील वाचा :