वनपरीक्षेत्राधिकारी एस.एच.राठोड यांचे कार्यकाळातील झालेल्या कामकाजाची व आर्थीक व्यवहाराची उच्च स्तरीय चौकशी करा

भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांची मुख्यमंत्री, वने सचिव व प्रधान मुख्य वनसंरक्षकाकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्त अंतर्गत येणाऱ्या भामरागड वनविभागातील एटापल्ली वनपरीक्षेत्रात एस. एच. राठोड वनपरिक्षेत्राधिकारी म्हणुन रुजू झाले त्या तारखेपासुन आजपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेली एकुण मंजूर कामे व त्या कामावरील करण्यात आलेला खर्चा नियमानुसार करण्यात आले काय?

तसेच त्यांचे कार्यक्षेत्रातील एकुण बिटाचे बिट निरीक्षण करुन त्या-त्या बिटातील वनजमिनी वरील अवैध अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध वृक्षतोड, वनरक्षक, वनपाल व अन्य वन कर्मचा-यांची मुख्यालयी उपस्थीती त्यांचे कारकीर्दीतील कामावर लावण्यात आलेले एकुण सर्व मजुर त्या मजुरांचे प्रत्येक व्हाऊचर तपासुन घेणे, त्यांचे सह्या वा अंगुठे तपासणे, मजुरांंनी प्रत्यक्ष किती दिवस कामे केली व त्यांना कामावर किती दिवस दाखविले.

मोजमाप पुस्तीका, प्रत्येक मजुराचे बँक पुस्तीका तपासुन घेणे व नियमानुसार करण्यात आलेली कामे याची खात्री करणे व त्यांचे कालावधीत करण्यात आलेली खोदतळे,  एकुण साहीत्य खरेदी, रोपवन लागवट व त्यावरील निदंणीचे सगळे व्हाऊचर यासह अन्य मुद्यावर एटापल्ली वनपरीक्षेञातील आरएफओ एस.एच. राठोड यांचे कार्यकाळातील त्यांचे कार्यक्षेञातील झालेल्या कामकाजाची व आर्थीक व्यवहाराची उच्च स्तरीय चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी करण्याकरीता भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंञी उध्दव ठाकरे,वने सचिव मंञालय मुंबई व वनबल प्रमुख  प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांना मेल व स्पीड पोष्टाने निवेदन पाठविले असुन या संदर्भात जिल्हाध्यक्ष विजय खरवडे स्वत: मुंबईला जाऊन मंञालयात मुख्यमंञी व वने सचिवाची भेट घेणार आहेत.

कारण वनाची संपती ही राष्ट्रीय संपती आहे. ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. वनाचे संरक्षण व संवर्धन योग्य व पारदर्शीपणे वनकर्मचारी व वनाधिकारी करीत नसल्याचे दिसुन येत आहे. जर का महिनाभरात चौकशीला सुरुवात न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे यांनी सांगीतले.

संबंधित बातम्या :

लोकस्पर्शचा दणका : अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड निलंबित

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

हे देखील वाचा :

कोरची तालुक्यातील समस्या तात्काळ मार्गी लावा

राजाराम खां. येथे १२० नागरिकांना शिकाऊ वाहनचालक परवाना (License) वितरित

 

 

 

 

lead storyVijay Kharwade