गृहमंत्र्यांनी घेतला गुन्हेगारांचा समाचार; अधिकाऱ्यांना सांगितली त्यांच्याच कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसायिकांची नावे

दारू, मटका, जुगार आणि अवैध रेती उपसा गृह विभागाच्या रडारवर

आर्वी , हिंगणघाट , वर्ध्यात लक्ष घालून पोलिसांना केलंय अलर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, २४ जानेवारी : गृहमंत्री म्हटले की राज्यभरात पोलीस विभागाच्या कार्यशैलीवर नजर ठेवणाऱ्या खुर्चीचीच आठवण आपल्याला होतेय. पण गृहमंत्र्यांनी जिल्ह्यात यावं आणि गुन्हेगारांची यादीच पोलीस अधीक्षक, आय जी, आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाचावी आणि आपण करताय तरी काय असाच प्रश्न पोलीस अधीक्षकांना विचारावा ही बाबच दुर्मिळ आहे. पण वर्ध्यात मात्र हे घडलंय. गृहमंत्र्यांनी वर्ध्यात येउन गृह विभागाचा आढावा घेतला.

पोलिसांच्या कार्यावर देखील बोट ठेवत काही गुन्हेगारांची नावे घेऊन यावर कारवाई का होत नाही असाच जाब विचारला आहे. गृहमंत्र्यांनी जाब विचारण्याचा हा व्हिडीओ आता जय महाराष्ट्र च्या हाती लागलाय. वाढत्या मटका, दारू, जुगार, आणि अवैध रेती उपस्यावर जिल्हा प्रशासन आणी पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहेय. आता या गृहमंत्र्यांच्या फटकेबाजीमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसायांकडे दुर्लक्ष होत असल्याचेच स्पष्ट झालेय.

Anil Deshmukh